शाळेच्या मुख्याध्यापकाशी विद्यार्थ्याच्या आईचे संभाषण

मुलाच्या हानीकारक वर्तणूक व अयोग्य स्वभावावर शाळेच्या मुख्याध्यापकाशी विद्यार्थ्याच्या आईचे संभाषण

आई: नमस्कार, श्री सातपुते सर. मला माझ्या मुलाच्या शाळेतील हानिकारक वर्तनाबद्दल मला काही विद्यार्थ्यांकडून माहिती मिळाली.  ते ऐकून मुलाच्या भवितव्याविषयी काळजी वाटते.  त्याबद्दल मला  तुमच्याकडून मदत आणि मार्गदर्शन हवे आहे.

मुख्याध्यापक: नमस्कार, ताई. कृपया तुम्हाला जे म्हणायचे आहे ते स्पष्टपणे सांगा. आम्ही तुम्हाला  आणि तुमच्या मुलाला नक्कीच मदत करू. 

आई: धन्यवाद सर!  अलीकडे,  माझा मुलगा  इतर विद्यार्थ्यांशी आक्रमकपणे वागतो. तो इतर मुलांशी मारामारी  आणि भांडणेपण करतो. त्यामुळे त्याचे शिक्षणावरून दुर्लक्ष होते आहे व परीक्षेत त्याला कमी गुण मिळत आहेत. याची मला खूप काळजी वाटते.

मुख्याध्यापक: मी तुमच्या काळजीचे कौतुक करतो. तुमच्या लक्षात आलेल्या तुमच्या मुलाच्या हानिकारक वर्तनाची काही उदाहरणे तुम्ही मला देऊ शकता का?

आई: नक्कीच. माझ्या मुलाने काही विद्यार्थ्यांसोबत मारामारी, गुंडगिरी केली आणि विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या मालमत्तेचे  काही नुकसान केल्याची माहिती मला मिळाली आहे.

मुख्याध्यापक : आता मला काही प्रमाणात समजले. आमच्याकडे अशा प्रकारचे वागणे  मुळीच खपवून घेतले जात नाही.  या प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल  व त्यावर उपाययोजना केली जाईल, याची मी खात्री देतो.

आई: धन्यवाद, सर, मला असेही वाटते की माझ्या मुलाला त्यांच्या वागण्याचे परिणाम  समजण्यासाठी आणि त्यांचे  वागणे बदलण्यासाठी  योग्य मार्गदर्शन व समुपदेशन यांची खूप आवश्यकता आहे.

मुख्याध्यापक :  होय. तुमच्या मुलास अधिक चांगले वागण्याचे कौशल्य विकसित करण्यास मदत करण्यासाठी आम्ही त्याचे वर्गशिक्षक,  काही विषयांचे शिक्षक  व शाळेच्या समुपदेशकासोबत बैठक आयोजित करू.

आई: ते  ठीक वाटते.  तुम्ही  हा प्रकार गांभीर्याने घेतले आणि मदत केली, याबद्दल मला समाधान वाटत आहे.

मुख्याध्यापक: आम्ही पालक आणि शाळा यांच्यातील चांगले संबंध  आणि  परस्पर सहकार्याला विशेष  महत्त्व देतो. तुमच्या पाठिंब्याने आम्ही तुमच्या मुलाला चांगला विद्यार्थी आणि देशाचा चांगला नागरिक  बनवण्यासाठी जे आम्हाला शक्य आहे ते सर्व काही करू.

आई: धन्यवाद,  सर. मी तुम्हाला माझ्या  मुलातील  बदल आणि इतर संबंधित गोष्टींविषयी सतत कळवत जाईन आणि आवश्यक ते सर्व सहकार्य करीन..

मुख्याध्यापक: तुमचे या शाळेत केव्हाही स्वागत आहे. शाळा व विद्यार्थी यांच्या विषयी कोणत्याही वेळी तुम्ही माझ्याशी, मुलाच्या वर्ग शिक्षकांशी आणि विषय शिक्षकांशी संपर्क करू शकता. आपण सर्व मिळून शाळेचे वातावरण चांगले ठेवण्यासाठी आणि मुलाचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करूया. 

"मराठी गुरू" या साईटवर आपले स्वागत आहे!


"मराठी गुरू" या साईटवर आपले स्वागत आहे!
Welcome to Marathi Guru!
This Site is Under Construction

मराठी शिकण्यासाठी व मराठी चांगले करण्यासाठी विशेष आगळावेगळा उपक्रम. सोबत दृक-श्राव्य साहित्य व विविध अध्ययन कृतिकार्यक्रम.
Special and Innovative project to Learn Marathi and to Improve Marathi, supported with audio-visual aids and various learning activities.

विद्यार्थ्यांसाठी- For Students-
पाठ्यपुस्तकातील पाठांचे अध्यापन, संबंधित व्याकरणाचा अभ्यास, वाचन- लेखन- श्रवण- भाषण कौशल्यांचा विकास, लेखन कौशल्यांचा सराव इत्यादीसाठी.

मराठी भाषिकांना- For Marathi People-
मराठी अधिक चांगले करण्यासाठी

अमराठी भाषिकांना- Non-Marathi People-
मराठी लिहिणे- बोलणे- वाचणे शिकण्यासाठी

कर्मचाऱ्यांना- For Employees-
विहित प्रमाणपत्र परीक्षेच्या तयारीसाठी

व्यावसायिकांना- For Professionals-
मराठी लेखन कौशल्य, संभाषण इत्यादीसाठी

सविस्तर माहितीसाठी About या पानावर जावे
या साईट वरील सर्व घटक/ विषय एकत्रितपणे माहीत करून घेण्यासाठी सर्व घटक एका दृष्टिक्षेपात- All topics at-a-glance- या पानावर जावे

For Students-
Teachings of Textbook Lessons, study of related Grammar, developing Reading - Writing - Listening - Speaking skills, practicing writing skills, etc.

For Marathi people-
To improve and make Marathi better.

Non-Marathi People-
To learn to write - to speak - to read Marathi.

For Employees-
To prepare for the prescribed Marathi certification exam.

For Professionals-
For Marathi writing skills, conversation and so on.

For detail information, please go to About page.
To know all the elements / topics of this site, please go to the page- सर्व घटक एका दृष्टिक्षेपात- All topics at-a-glance

Dummy Page- 3


Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur. Excepteur sint occaecat cupidatat non proident, sunt in culpa qui officia deserunt mollit anim id est laborum

निबंधाचे प्रकार- Types of Essay-

निबंधाचे प्रकार- Types of Essay-

आर्थिक प्राप्तीसाठी निबंध लेखन. Essay writing for Financial Gain.

आर्थिक प्राप्तीसाठी निबंध लेखन.  Essay writing for Financial Gain.

उच्चस्तरीय निबंध कसे लिहावे? How to write Upper Level Essay?

उच्चस्तरीय निबंध कसे लिहावे?  How to write Upper Level Essay?

शालेय निबंध कसे लिहावे? How to write School Essay?

शालेय निबंध कसे लिहावे?  How to write School Essay?

निबंध लेखनाचे महत्त्व. Importance of Essay Writing.

निबंध लेखनाचे महत्त्व.  Importance of Essay Writing.

निबंधाचा इतिहास. History of Essay Writing.

निबंधाचा इतिहास.  History of Essay Writing.

निबंध म्हणजे काय? What is an Essay?

निबंध म्हणजे काय? What is an Essay?